स्व. विखे यांच्या आत्म चरित्राचे प्रकाशन: नरेंद्र मोदी यांचे निम्मे भाषण मराठीत
अहमदनगर: पद्मविभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन व्हरचुअल पद्धतीने करण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले निम्मे भाषण हे चक्क मराठीतूनच केले. त्यामुळे लाइव्ह ऐकणाऱ्याना एक सुखद धक्का बसला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, वीर विरांगण, कर्मयोगी भूमी महाराष्ट्र भूमीला वंदन करत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी आत्मचरित्रातील अनेक दाखले मराठीतूनच दिले.
आत्मचरित्रातील ओळी उद्गारताना ते म्हणाले, मी स्वतः सत्तेपासून व राजकारणातून अलिप्त राहिलो नाही मात्र समाजासाठी राजकारण व सत्ता हे पथ्य मी कायम राखले. राजकारण करताना नेहमी समाजाचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला असे मराठीतूनच सांगितले.
शेतीत कौशल्य असल्याशिवाय माणूस शेती करू शकत नाही असे विखेंच्या शब्दात त्यांनी सांगितले. सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कोणत्याच धर्माची वा जातीची भटीक नाही. सहकारी चळवळ ही सर्व वर्गाच्या कल्याणाची आहे. असे त्यांनी लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विखे पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील कामांच तोंडभरून कौतुक केले. विखे पाटील यांनी सत्तेतून, राजकारणातून नेहमी समाजहित जपल अशा शब्दात विखे पाटलांच्या कार्याचा गौरव केला.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Late Padma Vibhushan Publication of the autobiography of Balasaheb Vikhe Patil