Home संगमनेर संगमनेर: कॅडबरीमध्ये निघाल्या अळ्या व अंडे, ग्राहकाचा संताप

संगमनेर: कॅडबरीमध्ये निघाल्या अळ्या व अंडे, ग्राहकाचा संताप

Sangamner News: ग्राहकानो सावधान! कॅडबरी मध्ये चक्क अळ्या व अंडे निघाल्याने ग्राहकाने केला संताप व्यक्त, ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी.

Larvae and eggs hatched in Cadbury, customer outrage

संगमनेर :  तालुक्यातील जोर्वे गावात कॅडबरी मध्ये चक्क अळ्या व अंडे निघाल्याने ग्राहकाने संताप व्यक्त केला आहे. या ग्राहकाने थेट अन्न सुरक्षा विभागाकडे तक्रार केली आहे. जागरूक ग्राहकांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

जोर्वेतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून एका चॉकलेट कॅडबरीचे दोन पॅकेट खरेदी केले. त्याची एक्सपायरीची मुदत संपलेली नव्हती. पॅकेट घरी नेल्यानंतर ती उघडली असता त्यामध्ये चक्क अळ्या व अंडे निघाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ दुकानदाराशी संपर्क साधला. दुकानदाराने वितरकाकडे बोट दाखविले. संगमनेर येथील वितरकाशी ग्राहकाने संपर्क साधला असता त्यांनी चक्क उद्दामपणे विष खाऊन सुद्धा माणसाला काही होत नाही, तर सदर कॅटबरी खाल्ल्याने काही होणार नाही व मी काही घरी बनवत नाही, असे उत्तर दिले. सदर ग्राहक व वितरक यांच्यात झालेला फोनवरील संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान सदर ग्राहकाने औषध व प्रशासन अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला असता त्यांनी एक्सपायर झालेला माल असेल तर व माल साठविण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष असेल तर असे होऊ शकते. सदर कॅडबरी ही एक्सपायर झालेली नव्हती, त्यामुळे साठविण्याच्या प्रक्रियेमध्ये निश्चितच दोष असू शकतो. ग्राहकाने कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सदर ग्राहकाने केली आहे.

सदर ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने ज्या दुकानातून कॅडबरी घेतली त्याचबरोबर जो ठोक विक्रेता आहे, या दोघांकडून नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहे, याचा जो काही अहवाल येईल, त्यानुसार दोषींवर कार्यवाही केली जाईल, असे अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. पवार यांनी सांगितले.

Web Title: Larvae and eggs hatched in Cadbury, customer outrage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here