Home अहमदनगर पैशाच्या बदल्यात जमीन बळकावली, सावकारी कायद्यानुसार गुन्हा

पैशाच्या बदल्यात जमीन बळकावली, सावकारी कायद्यानुसार गुन्हा

Rahata Land grab in exchange for money, a crime

Ahmednagar News | राहता | Rahata Crime: तीन लाख रुपये किमतीची ४० गुंठे शेतजमीन बळजबरीने खरेदी खत करून घेतल्याने राहता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी शैलेश गायकवाड रा, नांदुर ता. राहता याने पोलिसांत फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हंटले आहे की, शैलेश गायकवाड यांच्या पत्नीच्या किडनीच्या ऑपरेशनसाठी पैशाची आवश्यकता असल्याने भारत लोखंडे ता.श्रीरामपूर यांच्याकडून ३ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. तसेच आरोपी लोखंडे याने राहता निम्बंधक कार्यालयात खात्रीलायक म्हणून १४ डिसेंबर २०२० रोजी नांदूर ता. राहता येथील गट क्रमांक १०१ मधील ४० गुंठे शेतजमीन गायकवाड यांच्याकडून बळजबरीने खरेदीखत करून घेतली. त्यानंतर गायकवाड यांनी व्याजाचे पैसे लोखंडे यास दिले मात्र तुझ्याकडे एकूण ६ लाख ६० हजार रुपये व्याजासह झाले आहेत असे आरोपीने गायकवाड यास सांगितले आहे. त्यावर गायकवाड यांनी पैसे परत करतो माझी जमीन मला परत कर अशी विनंती आरोपीला केली असता शिवीगाळ व दमदाटी केली. या फिर्यादीवरून राहता पोलिसांनी आरोपीविरोधात सावकारी कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार संतोष पगारे हे करीत आहे.   

Web Tile: Rahata Land grab in exchange for money, a crime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here