Home अहमदनगर उन्हामुळे लाहीलाही : नगरचा पारा @ ४१ डिग्री

उन्हामुळे लाहीलाही : नगरचा पारा @ ४१ डिग्री

Breaking News | Ahmednagar Heat Wave: नगर जिल्ह्याचे तापमान ४०.९ डिग्री असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध.

Lahi Lahi due to heat City mercury 41 degrees

अहमदनगर:  एप्रिलमध्ये उष्ण आणि दमट हवामानाने काहिली झालेली असताना आता मे महिन्यातही राज्याच्या बहतांश भागात सरासरीहून अधिक कमाल तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा अधिक असू शकतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, गुरूवारी नगर जिल्ह्याचे तापमान ४०.९ डिग्री असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. वाढलेल्या तापमानामुळे माणसांसह जनावरांची लाहीलाही सुरू असून त्याचा परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहे.

दरवर्षी नगर जिल्ह्यात १५ एप्रिल ते १५ मे यादरम्यान उन्हाचा चटका वाढत असतो. विशेष करून मे महिन्याच्या सुरूवातीच्या १५ दिवसांत जिल्ह्यात वैशाख वणव्याचा चटका वाढत असतो. यंदा मात्र, गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून एकीकडे अवकाळी तर दुसरीकडे वाढलेले तपमान यामुळे माणसांसोबत उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातावर उपचार करण्यासाठी नगर जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उष्माघाताचा रुग्ण आल्यावर त्यावर करण्यात येणारे उपचाराचे प्रोटोकॉल याबाबत संबंधितांना सूचना दिलेल्या असून शासकीय डॉक्टर आणि उपचार करणाऱ्या यंत्रणांच्या बैठका घेण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

शेती पिकांची लाहीलाही होताना दिसत आहे. मे महिन्याला सुरूवात झाली असून गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातील उष्णतेत कमालीची वाढ झालेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पारा ४० अथवा त्यापुढे असल्याचे दिसत आहे. गुरूवारी भारतीय हवामान विभागाच्या मुंबईच्या संकेतस्थळावर नगर जिल्ह्याच्या तपमानाची नोंद ही ४०.९ डिग्री नोंदवली असून बीड जिल्ह्यात देखील एवढेच तापमान नोंदवले गेले आहे. त्या तुलनेत शेजारच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्याचे तापमान नगरपेक्षा कमी असल्याचे दिसत आहे. नाशिक विभागात काल सर्वाधिक तपमान मालेगावात ४३ डिग्री नोंदवले गेले आहे. सध्या नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यामुळे राजकीय मेळावे, बैठका, सभा यासह लग्नाचा धडाका जोरात आहे. वाढलेल्या तपमानामुळे त्यावर देखील परिणाम होताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील अन्य जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असून यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Lahi Lahi due to heat City mercury 41 degrees

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here