कुंटणखाना, या हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा
Breaking News | Prostitution Business: छापा टाकून हॉटेलमध्ये सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस आला आहे. पीडित महिलांसमवेत दोघांना ताब्यात.
नांदगाव : नांदगाव पोलिसांनी वाखारी शिवारात छापा टाकून हॉटेलमध्ये सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस आला आहे. पीडित महिलांसमवेत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी (दि. १२) ही कारवाई झाली.
हॉटेल वृंदावन पॅलेसमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून कुंटणखाना चालत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर धाड टाकण्यात येऊन दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदाअंतर्गत मोहम्मद अख्तर सोनावाला (रा. वाखरी परिसर) व सचिन भाऊराव इंगळे (रा. मनमाड) या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच या हॉटेलवर कारवाई झाली होती. तेव्हादेखील या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले होते. त्यास काही दिवस उलटताच पुन्हा व्यवसाय थाटण्यात आला होता. पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहे.
Web Title: Kuntankhana, police raid in this hotel
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study