अकोले: कुंभेफळ येथील वीरभद्र मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरीस
अकोले: कुंभेफळ येथील वीरभद्र मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरीस
अकोले: अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील विरभद्र मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नजीकच असलेले गावचे श्रद्धास्थान असणाऱ्या शेषनारायण मंदिराचे कुलूपही चोरट्यांनी तोडले मात्र मंदिरातील दानपेटी पळविण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. विरभद्र मंदिरातील मूर्तीचा मुकुट चोरण्याची ही चौथी वेळ आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांनी अज्ञात चोरट्यानविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अकोले पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुम्बेफल येथील विरभद्र मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरातील देवाच्या मूर्तीचा ३५ भार वजनाचा सुमारे १५ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरून नेला. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १६ एप्रिल पहाटे चार वाजेच्या दरम्यान हि घटना घडली. या मंदिराच्या जवळच असणाऱ्या शेषनारायण मंदिराचे प्रवेशद्वाराचे कुलूपही तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र शेषनारायणच्या कृपेने त्यांचा प्रयत्न फसला.
दरम्यान मंदिराचे पुजारी चंद्रकांत भालेराव हे पूजेसाठी आले असता त्यांच्या हि चोरी निदर्शनास आली. व त्यांनी गावकर्यांनी माहिती दिली. त्यानंतर मंदिराचे पुजारी चंद्रकांत विठ्ठल भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास अकोले पोलीस करीत आहे.
Website Title: Kumbephal Virbhadra Temple theft