Home पुणे गाडीवरचे नियंत्रण सुटलं अन् कठड्यावर आदळली, दोघांचा मृत्यू

गाडीवरचे नियंत्रण सुटलं अन् कठड्यावर आदळली, दोघांचा मृत्यू

Breaking News | Kothrud Accident: दोन्ही तरुणांचा पूलाच्या कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्यू झाला.

Kothrud Accident Car lost control and hit a curb, two killed

पुणे:  कोथरूडच्या सावरकर पुलाच्या कठड्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दोन तरुणांची दुचाकी आदळली.  दोन्ही तरुणांचा पूलाच्या कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.  कोथरूडमधील पौड फाट्याजवळील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. पुलाच्या कठड्यास धडकून दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत सर्वेश गोपाळ पाटील (वय 20) आणि पुष्कर सुधाकर चौधरी (वय 19, रा. तुरक गुप्हाडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) या तरुणांचा मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, सर्वेश पाटील हा त्याचा मित्र पुष्कर चौधरी याच्यासोबत दुचाकीवरून स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावरून जात होता. दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि ती थेट पुलाच्या कठड्यावर धडकली. जोरदार धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले.अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Kothrud Accident Car lost control and hit a curb, two killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here