तरुणाने तरुणीशी फसवून लग्न केले,फारकतीस पैशाची मागणी, गुन्हा दाखल
कोपरगाव | Kopargaon: तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील उच्च शिक्षित २४ वर्षीय तरुणीशी संगत करून तिला खोटे सांगून सही करून घेत लग्न केले त्यानंतर दीड वर्षांनी फारकतीसाठी २० लाख रुपयाची रक्कम मागितली. याप्रकरणी माहेगाव देशमुख येथील राहुल हसाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माहेगाव देशमुख येथील तरुण राहुल हसाळकर उच्च शिक्षित असल्याचे सांगत त्याच गावातील उच्च शिक्षित तरुणीस पुणे येथे गाडीने सोडविण्यास गेल्याने ओळख करून घेत संपर्क वाढवून त्याचा गैरफायदा घेतला. आरोपीने तिच्या सोबत फोटो काढले, त्याचा वापर करून वडील व भाऊ यांना मारण्याची धमकी देत तिला फसवून सही करून घेतली. बळजबरीने लग्न केले व फोटो काढून संमती नसताना लग्नाचे कागद तिला वाचून न दाखविता सह्या करून घेतल्या.
त्यानंतर फिर्यादी तरुणीने फारकत मागितली असता तिच्याकडे २० लाखाची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुणे येथील हिंजवडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Kopargaon young man cheated on the young woman and married