Kopargaon: कोपरगाव तालुक्यात ४६ रुग्णांची वाढ तर २८ जणांना डिस्चार्ज
कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यात आज दि.१४ रोजी ४६ रुग्णांची वाढ झाली आहे तर २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोपरगाव कोविड सेंटरमध्ये १६४ टेस्ट करण्यात आल्यात त्यामध्ये ४१ बाधित आढळून आले आहेत. तर नगर येथील अहवालात ५ करोनाबाधित आढळले आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्याकडून प्राप्त झाली आहे. कोपरगाव तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या १२९९ इतकी झाली आहे. सध्या १४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. करोनाने २३ रुग्णांचे बळी घेतले आहेत.
कोपरगाव शहरातील बाधित संख्या:
सब जेल कोपरगाव ९
अंबिका चौक २
धारणगाव रोड १
वडांगळे वस्ती १
येवला नाका २
वाणी सोसायटी २
महादेव नगर ३
गांधी नगर १
बिरोबा चौक १
खडकी १
समता नगर २
गारदा नाला १
लक्ष्मी नगर १
तर ग्रामीण भागात मधील खालीलप्रमाणे :
कोकमठाण १
उक्कडगाव ६
बक्तरपूर ६
खिर्डी गणेश ३
कोळपेवाडी १
धामोरी १
यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या १२९९ वर पोहोचली आहे.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Kopargaon Taluka 46 corona infected today news