जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण, पती पत्नी गंभीर जखमी
कोपरगाव | Kopargaon: जमीन वाटपाच्या कारणावरून पती पत्नी यांना कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गावात घडली आहे. या वादात रमेश निकम व शालिनी निकम या पत्नींना मारहाण झालेली आहे.
याप्रकरणी शालिनी निकम यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून दिलीप दिनकर निकम, मोतीराम दिनकर निकम, भूषण दिलीप निकम रा. सुरेगाव यांच्याविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेगाव येथे फिर्यादी महिला शालिनी व तिचा पती रमेश निकम राहतात. त्यांचे जमीन वाटपावरून वाद सुरु आहेत. या वादातून भांडणे झाली. फिर्यादी महिलेचे सासरे दिनकर बच्चन निकम यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीचे वाटप होणे बाकी आहे. फिर्यादी महिलेचा पती व आरोपी हे दोघे भाऊ भाऊ आहेत. त्यांचे आपापसांत वाद मिटले नाहीत. त्यांचे काल ४.३० वाजता भांडण विकोपाला गेले. आरोपी दिलीप दिनकर निकम मोतीराम दिनकर निकम, भूषण दिलीप निकम यांनी फिर्यादी महिला व तिचे पती यांना शिवीगाळ करत काठीने, कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. फिर्यादी महिलेचा डावा हात गंभीर दुखापत होऊन त्यास तडा गेला आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Kopargaon News Beaten with an ax in a land dispute