Home कोपरगाव अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Kopargaon Molestation of a minor girl

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग त्याच गावातील तरुणांनी केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीने कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यानुसार दिलीप कदम, दीपक दिलीप कदम, सचिन दिलीप कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाने येसगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येसगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी अल्पवयीन मुलगी, तिचे आई वडील व अन्य कुटुंबीय राहते. आरोपीचे जवळच दुकान आहे. आरोपी ने फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या घरासमोर लाकडी दांडके घेऊन येऊन त्यांनी फिर्यादी मुलीस व तिच्या आईस म्हणाले की, तुम्ही आमच्या दुकानात येणाऱ्या लोकांना काही पण सांगता असे म्हणून फिर्यादी अल्पवयीन मुलीस व तिच्या आईस लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच आरोपी दीपक कदम याने फिर्यादी मुलीस तिची छाती दाबून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादीच्या गळ्यास ओरबाडून जखम केली. फिर्यादीची आई सोडविण्यास आली असता तिला लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फिर्यादी मुलीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.  

Web Title: Kopargaon Molestation of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here