Home कोपरगाव व्यापाऱ्याचे घर फोडले साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

व्यापाऱ्याचे घर फोडले साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

kopargaon looted Rs 3.5 lakh from trader's house

कोपरगाव: एका व्यापाऱ्याचे घर फोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह सुमारे ३ लाख हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. कोपरगावमधील श्रद्धानगरी येथे ही घटना घडली आहे. या चोरीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.  

याप्रकरणी अक्षय कैलास लोहांडे वय २६ रा. श्रद्धानगर ता. कोपरगाव याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे बारा ते १:४५ वाजेच्या दरम्यान श्रद्धानगर पराग प्लाझा येथील आपल्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ६५ हजार हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

याप्रकरणी लोहांडे यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बोरसे हे करीत आहे.

Web Title: kopargaon looted Rs 3.5 lakh from trader’s house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here