कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील गांधीनगर येथील तरुणाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान घरात घुसून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आरोपी नकुल धर्मराज ठाकरे रा. गांधीनगर याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पिडीत मुलगी हि गजानन नगर येथे उपनगरातील नजीकच्या शाळेत शालांत वर्गात शिकत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही गजानन नगर येथे आपल्या आई वडिलांसोबत राहते. आरोपी व तिची ओळख आहे. दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास तिच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी नकुल ठाकरे याने अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करून तिच्याशी लगट करून मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिने याबाबत प्रतिकार केला असता तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत तिचे काका घरी असता घडलेला सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात आज दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Kopargaon into a house and molesting a minor girl