कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील हनुमाननगर येथे महिला आपल्या घरातील स्वयंपाक काम करीत असताना त्याच गावातील आरोपी याने मागील बाजूने येऊन महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत महिलेने कोपरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अनिल शिवाजी वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला ही गुरुवारी दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या घरात काम करत असताना आरोपी अचानक न विचारता घरात प्रवेश करून या महिलेला मागील बाजूने येऊन तिला मिठीत घेऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा आरोपी त्यांच्या गावातील आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पी.बी. काशीद हे करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Kopargaon Filed a case of molestation of a woman