सुरीचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले, ५ लाखाला लुटले
कोपरगाव | Kopargaon: एका व्यापाऱ्यांनी दुकान बंद करून घरी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सुरयाचा धाक धाकवत त्यांच्याकडील असलेले बॅगमधील ४ लाख ९८ हजार ९०० रुपये आणि मोबाईल लुटून नेण्याची घटना शुक्रवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील भाईभाई गरेजसमोर अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी दिलीप शंकर गौड यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार कोपरगाव शहरातील किशोर वाईन्स हे दुकान चालविण्यास घेतलेले आहे. दुकानातील दिवसभरातील जमलेली रोख रक्कम ४ लाख ९८ हजार ९०० रुपये बॅगेत घेऊन रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून नेहमीप्रमाणे स्कुटीवरून घरी जात होतो. माझ्यासोबत दुसऱ्या दुचाकीवर मजूर सचिन साळवे हा होता. भाईभाई गरेजसमोर आले असता पाठीमागून विना नंबरच्या दोन दुचाकीवरून चार अज्ञात चोरटे येऊन त्यांनी हातात असलेली बॅग ४ लाख ९८ हजार ९०० रुपये आणि मोबाईल सुरयाचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेली.
याप्रकरणी व्यापारी दिलीप शंकर गौंड यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्याविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Kopargaon Fearing a knife robbed the merchant