अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचारः आजीकडे आली अन…
Breaking News | Ahmednagar: आजीकडे राहण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना.
कोपरगाव: शहरातील एका उपनगरात आजीकडे राहण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीबर तरुणाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका भागात १६ वर्षीय मुलगी आपल्या आजीकडे राहण्यास आली होती. दि. २४ एप्रिल रोजी दुपारी मुलगी घरी एकटीच होती. ती एकटी असल्याचे पाहून अरबाज मजीद कुरेशी रा. संजयनगर याने घराच्या मागील बाजूच्या भिंतीवरून उडी टाकून आत प्रवेश केला. पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवून त्याच्यासोबत शरिर संबंध केले. त्यानंतर मुलीने लग्न कधी करणार अशी विचार केली, तेव्हा त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर पीडितेने कोपरगाव शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी अरबाज करेशी विरूद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहा.पो.नि. रोहीदास ठोंबरे करीत आहेत.
Web Title: Kopargaon Abuse of a minor girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study