Home कोपरगाव माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ

Kopargaon abuse of a married woman to bring money

कोपरगाव | Kopargaon: माहेरून बोलेरो जीप घेण्यासाठी आठ लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिले आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महिलेचे १४ मार्च २०१८ रोजी सागर भानुदास शेळके याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या माणसांनी त्यांचे रंग दाखविण्यास सुरुवात केली. फिर्यादी महिलेने बोलेरो जीप घेण्यासाठी माहेरून आठ लाख रुपये आणावे. यासाठी तिला शिवागाळ व मारहाण करण्यात आला. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तिला घराबाहेर काढून दिले. याप्रकरणी शहर पोलिसांनी पती सागर भानुदास शेळके, सासरे भानुदास शांताराम शेळके, सासू मंगल भानुदास सासरे, भाया अमोल भानुदास शेळके, जाव वंदना अमोल शेळके, नणंद चांदणी पाखरे, ज्ञानेश्वर पाखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Kopargaon abuse of a married woman to bring money

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here