Home Accident News Accident: कंटेनर मोटारसायकल अपघातात दोघे जण ठार

Accident: कंटेनर मोटारसायकल अपघातात दोघे जण ठार

Kolhar Container motorcycle Accident 

कोल्हार | Accident: कोल्हार भगवतीपूर येथे कंटेनर व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात दोन जण ठार झाले आहे. गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास काळामाळा जवळ ही घटना घडली.

गोरख बापूसाहेब पुरी वय २८ रा. खुडसर ता. राहुरी कैलास शिवाजी पवार वय ४५ रा. खुडसरगाव असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे.

लोणीजवळ काळामाळा येथे कंटेनर एम.एच.४३ एफ. ५१४४ व मोटारसायकल एम.एच.१२ सी.एन. ४४९९ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली यामध्ये गोरख पुरी हा जागीच ठार झाला तर पवार गंभीर होऊन उपचार करीत असताना त्यांचा मृत्यू झाला.

कंटेनर चालक लोणीच्या दिशेने जात असताना त्यास लोणी पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे.

Web Title: Kolhar Container motorcycle Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here