अकोले तालुक्यात आज ३४ करोनाबाधित, शिक्षकांना करोना चाचणी आवाहन
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात ३४ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २६५७ इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात रुंभोडी येथे १५ वर्षीय मुलगा, बाजारतळ अकोले येथे ३७ वर्षीय पुरुष, गुरवझाप येथे २८ वर्षीय तरुण, मनोहरपूर येथे ३६ वर्षीय पुरुष तर ६० व २९ वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे ६५,६,४५,७८,५०,२६,२८ वर्षीय महिला, नवलेवाडी येथे १८ वर्षीय तरुण, ५२ वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला, अकोले येथे ३६,६७ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर अकोले २३ वर्षीय महिला, परखतपूर ५० वर्षीय पुरुष, सुगाव बुद्रुक येथे ५५ वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष, निब्रळ येथे ५४ वर्षीय पुरुष, सावरचोळ संगमनेर ७५ वर्षीय पुरुष, गणोरे येथे २९ व २४ वर्षीय तरुण, ८२ वर्षीय पुरुष, पिंपळदरी ४२ वर्षीय महिला, सिध्देश्वर रोड अकोले ७५ वर्षीय पुरुष, इंदोरी येथे ५७,३६,२ वर्षीय महिला, ६८,४१ वर्षीय पुरुष असे ३४ जण बाधित आढळून आले आहेत.
सर्व शिक्षकांसाठी विभागवार RTPCR टेस्ट ची सुविधा कोतुळ विभागातील शाळेच्या शिक्षकांनी कोतुळ ग्रामीण रुग्णालय, समशेरपूर विभागातील शाळेच्या शिक्षकांनी समशेरपूर ग्रामीण रुग्णालय, राजूर विभागातील शाळेच्या शिक्षकांनी राजूर ग्रामीण रुग्णालय व अकोले विभागातील शाळेतील शिक्षकानी विठ्ठल लॉन्स येथे सकाळी 11 वाजता टेस्ट करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
Web Title: Akole Taluka 34 corona infected Today Teachers test