Home संगमनेर संगमनेर: कर्जदाराने तक्रार दाखल केल्याने चाकू हल्ला

संगमनेर: कर्जदाराने तक्रार दाखल केल्याने चाकू हल्ला

Breaking News |sangamner Crime: कर्जदाराने सहायक निबंधकांकडे तक्रार दाखल केल्याच्या रागातून सावकाराच्या चुलतभावाने कर्जदारावर वाहनाच्या चावीतील की-चैनमधील धारदार चाकूचे वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न.

Knife attack after borrower files complaint

संगमनेर: कर्जदाराने सहायक निबंधकांकडे तक्रार दाखल केल्याच्या रागातून सावकाराच्या चुलतभावाने कर्जदारावर वाहनाच्या चावीतील की-चैनमधील धारदार चाकूचे वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली. संगमनेर तालुक्यात साकूरजवळ बिरेवाडी येथे गुरुवारी ही घटना घडली. मुक्ताराम काशिनाथ सागर असे जखमीचे नाव आहे.

मुक्ताराम सागर हे शेतकरी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावात लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश हे अवैध सावकारीचा व्यवसाय करतात. सागर यांनी ढेंबरेकडून काही दिवसांपूर्वी एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेचा आतापर्यंत तब्बल १२ लाख रुपयांचा परतावा केल्याचे आणि तसे पुरावे असल्याचे सागर यांचे म्हणणे आहे. व्याजाने रक्कम घेतवेळी २० गुंठे जमीन गहाणखत करण्याच्या नावाखाली ढेंबरे यांनी खरेदीखत करून घेतली आहे. आणखी काही वाढीव रकमेसाठी ढेंबरे शिवीगाळ, मारहाण करीत सागर यांना पैशाचा तगादा करीत होते. शेवटी त्रासाला कंटाळून सागर यांनी संगमनेरातील उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली होती. हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. मात्र ही तक्रार केल्याचा राग मनात ठेवून ढेंबरे यांनी भ्याड हल्ला केल्याचे सागर यांनी सांगितले.

गुरुवारी (दि. १८) सकाळी साडेनऊच्या सुमारास बिरेवाडीतील सोसायटीसमोर सागर व सावकाराचा चुलतभाऊ पंढरीनाथ पांडुरंग ढेंबरे यांच्यात यावरून बाचाबाची झाली. या वेळी नागरिकांनी भांडण मिटविले. यानंतर सागर मोटारसायकलवरून घरी जात असताना पाठीमागून मोटारसायकलवरुन पंढरीनाथ ढेंबरे त्यांचा पाठलाग करीत आला. सागर यांच्या मोटारसायकलला वाहन आडवे लावून तो म्हणाला, ‘चुलतभाऊ लालू ढेंबरे व मुलगा योगेश ढेंबरे यांच्याविरोधात उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज का केला,’ असे म्हणत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चावीच्या की-चैनचा चाकू सागर यांच्या डोळ्याच्या वर मारून गंभीर जखमी केले. दरम्यान, तक्रार मागे न घेतल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना ठार मारीन, अशी धमकी दिली.

याप्रकरणी मुक्ताराम काशिनाथ सागर यांच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करीत आहेत.

Web Title: Knife attack after borrower files complaint

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here