Home अहमदनगर अहिल्यानगर: युवकाचा खून करून मृतदेह फेकला कालव्यात

अहिल्यानगर: युवकाचा खून करून मृतदेह फेकला कालव्यात

Breaking Ahilyanagar News: युवकाचा खून करून मृतदेह कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये फेकून दिल्याची घटना आली समोर.

Killed the youth and threw the body in the canal

कर्जत: बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये फेकून दिला. बीड येथील रणजीत सुनील गिरी (वय 23) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  मृतदेहाचे कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. मयत युवकाच्या गळ्याभोवती जखम व फाशी दिल्यासारखा व्रण आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. बीड येथे राहणारा रणजीत सुनील गिरी हा हॉटेल आणि ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो गायब होता. घरच्यांची संपर्क केल्यावर फोनवरून तो मी व्यवस्थित आहे असे सांगत होता. त्यामुळे तो कुठेतरी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये काम करत असेल असे घरच्यांना वाटत होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

मयत रणजीत गिरी याच्यावर मिरजगाव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जानेवारीपासून तो कर्जत येथील पोलीस कोठडीतच होता. तीन महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर देखील मयत रणजीत गिरी बीडला न जाता या परिसरामध्ये राहत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांनी दिली.

Web Title: Killed the youth and threw the body in the canal

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here