प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याने तरुणीला संपविले
Breaking News | Mumbai Crime: प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवत तिची निघृणपणे हत्या.
मुंबई : मानखुर्दमधून बेपत्ता झालेली पूनम क्षीरसागर (२७) हिचा उरणमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली, प्रियकर निजामुद्दीन शेख याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवत तिची निघृणपणे हत्या केली. याप्रकरणी उरण पोलिसांनी त्याला अटक केली.
मानखुर्दच्या अण्णा भाऊ साठेनगरमध्ये पूनम राहण्यास होती. आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार तिचा शोध घेत असताना उरणमध्ये मृतदेह आढळला. सहा महिन्यांपूर्वी पूनमची निजामुद्दीन याच्यासोबत ओळख झाली होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत आठ दिवसांपूर्वी कल्याण परिसरात नेले. त्या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर आरोपीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह उरणमधील चरनेर- तिघाटी रस्त्यावर फेकून दिला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मानखुर्द येथे जाऊन पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. मुंबईतील अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांगलादेशींचा बंदोबस्त करा, अशा सूचना त्यांनी महापालिका अधिकारी, तसेच पोलिसांना दिल्या.
Web Title: killed the young woman by dragging her into the net of love
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study