सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाला संपवलं
Jalgaon Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून जळगावात जावयाची निर्घृण हत्या.
जळगाव: जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून जळगावात जावयाची निर्घृण हत्या केली आहे. मुकेश शिरसाट असे हत्या झालेल्या 26 वर्षीय तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाच वर्षांपूर्वी मुकेश शिरसाट आणि पुजा सोनावणे यांचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागातील रहिवासी होते.मुकेश आणि पुजा यांनी यांनी 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेमविवाह केला. पण पूजाच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हंत. घरच्यांच्या विरोधात जाऊन पुजाने मुकेशसोबत लग्न केल्याने तिच्या कुटुंबियांच्या त्यांच्यावर राग होता. मुकेश हातमजुरी करून संसार चालवायचा. तर पुजाही घरकाम करून संसाराला हातभार लावत होती.
दुसरीकडे लग्नाला तीन-चार वर्षे लोटूनही पूजाच्या माहेरच्यांकडून सातत्याने वाद निर्माण केले जात होते. अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही गेले. पूजाच्या घरचे वारंवार तिला आणि मुकेशला जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते. पण कौटुंबिक वादामुळे पोलिसांनी कोणतीही कठोर भूमिका न घेता दोन्ही कुटुंबियातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. पण मुकेशच्या काटा काढायचाच हे पूजाच्या माहेरच्यांच्या डोक्यात होते.
सोमवारी (20 जानेवारी) मुकेश कामासाठी घरातून बाहेर पडला असतानाच पूजाच्या कुटुंबियांनी मुकेशवर धारधार शस्त्राने वार केले. मुकेशला वाचवण्यासाठी गर्भवती पूजाने घरातून बाहेर धाव घेतली तर तिच्यावरही वार करून तिलाही संपवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी मुकेशच्या कुटुंबियांवरही हल्ला केला. सुदैवाने पूजा बचावली. पण आपल्याच माहेरच्यांनी मुकेशची हत्या केली आणि आपल्यावरही वार केले,असा आरोप पूजाने केला आहे.
मुकेश आणि त्याच्या सासरच्या नातेवाईकांमध्ये 18 जानेवारीच्या संध्याकाळी वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, पण रविवारी सकाळी सुमारे 8.30 वाजता, मुकेश कामासाठी घराबाहेर पडत असताना, त्याच वेळी हातात लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रं घेऊन मुकेशच्या सासरचे काही लोक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला.
मुकेशला वाचवण्यासाठी काही लोक पुढे सरसावले, पण जमावाने त्यांच्यावरही हल्ला चढवला. दरम्यान, मुकेशची गर्भवती पत्नी पूजा हिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पूजाची नणंद वेळीच घटनास्थळी पोहोचली आणि तिच्या हस्तक्षेपामुळे गर्भवती पूजा या हल्ल्यातून बचावली.
मुकेशची त्याच्याच घरासमोर सासरच्या लोकांनी हत्या केल्यामुळे जळगावात शोककळा पसरली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या चार ते पाच जणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुकेश आणि पूजा यांना तीन वर्षांची मुलगी असून पूजा गर्भवती आहे. अशा परिस्थितीत मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Web Title: killed his son-in-law out of anger for having a love marriage
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News