Home औरंगाबाद गुप्त धनाच्या नावाखाली जंगलात नेत मित्राची केली हत्या

गुप्त धनाच्या नावाखाली जंगलात नेत मित्राची केली हत्या

Breaking News |Crime: पहिले दारूतून विष पाजून, दगडाने डोके ठेचून हत्या.

killed his friend by taking him to the forest in the name of secret money

छत्रपती संभाजीनगर: गुप्तधन शोधण्याचे कारण करून संतोष सुरेश खिल्लारे (३४) यांना मित्र मोहन साळवे (४४, रा. मुकुंदवाडी) याने ५ नोव्हेंबर रोजी घनदाट जंगलात नेले. त्यानंतर पहिले दारूतून विष पाजून, दगडाने डोके ठेचून हत्या केली. रविवारी सकाळी आडगाव बुद्रक शिवारात मृतदेह सापडल्यानंतर ही हत्या उघडकीस आली. सिंदीबनमध्ये कुटुंबासह राहणारे संतोष खासगी कंपनीत वेल्डर होते. त्यांचे कुटुंब व मोहन गट्ठ तयार करणाऱ्या कंपनीत सोबत असल्याने त्यांच्यात ओळख होती.

संतोषचा वैयक्तिक वादातून मोहन वर संशय होता. संतोष यांनी मोहनला जिवे मारण्याची धमकी दिली होती. संतोष आपल्याला मारेल, त्यापूर्वी त्याची हत्या करण्याचा कट मोहनने आखला होता.

५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गुप्तधन शोधण्यासाठी जायचे असल्याचे कारण करून त्याने संतोष यांना आडगाव बुद्धक शिवारात नेऊन दारू पाजली. त्यानंतर दगडाने डोके ठेचून हत्या केली.

कुटुंबाने ६ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात संतोषच्या बेपत्ताची तक्रार दिली. ८ नोव्हेंबरपर्यंत तपास न लागल्याने निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सहायक निरीक्षक भरत पाचोळे यांना तपासाच्या सूचना केल्या.

पाचोळे, अंमलदार संजय नंद, संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे एका दुचाकीवर कैद झाले. त्यानंतर पथकाने मोहनला शनिवारी ताब्यात घेतले. विष पाजून डोके ठेचले; नंतर ढकलून दिले चौकशीत मोहनने हत्येची देत घटनाक्रमाचा सांगीतला. पहिले दारूच्या बाटल्या घेऊन संतोषला जंगलात नेले. दारूमधून पहिले विष पाजत दगडाने डोके ठेचून मारले. मृत्यू झाला नसावा, या संशयातून संतोषला दरीत ढकलून दिले. रविवारी निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळ गाठले, तेव्हा संतोष यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दरीत झाडावर आढळला. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह काढून घाटीत नेण्यात आला.

Web Title: killed his friend by taking him to the forest in the name of secret money

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here