अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण, कारचे टायर फुटल्याने महिलेचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Crime: एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस.
राहुरी: तालुक्यातून दि. १६ मे रोजी रात्रीच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. १६ मे रोजी रात्री घरातील लोकांनी जेवण केल्यानंतर मुलगी १२.१५ वाजे पर्यंत टिव्ही पाहत होती. त्यानंतर ती झोपी गेली. दि. १७ मे रोजी पहाटे ४ वाजे दरम्यान पिडीत मुलीच्या वडिलांना जाग आली. त्यावेळी त्यांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात तीचा शोध घेतला. मात्र ती कोठेही आढळून आली नाही. आपल्या मुलीला कोणीतरी फूस लावून तीचे अपहरण केले. अशी तिच्या नातेवाईकांची खात्री झाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानूसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार ठार- Accident
सिन्नर – नाशिक-पुणे महामार्गावर दोडी बुद्रुक शिवारातील गोपालकृष्ण लॉन्स समोर बजाज पल्सर (एम.एच.१६, बी. बी. ००५७) वरुन रस्ता ओलांडताना संगमनेरच्या दिशेने जाणाऱ्या नवीन स्कॉर्पीओने धडक दिली. यात दुचाकी चालक जाने आलम हा गंभीर जखमी झाला. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
कारचे टायर फुटल्याने अपघात महिलेचा मृत्यू- Accident
गोंडेगाव – श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथून नेवाशाच्या दिशेने निघालेल्या स्विप्ट कारचे मागील टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये गोंडेगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
ही घटना रविवार दुपारी नेवासा-श्रीरामपूर रोडवर नेवासा हद्दीत घडली. गोंडेगाव येथील मिराबाई गणपत फोपसे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. स्विप्ट कार (क्र. एमएच १७ सीआर ११२३) मध्ये दोन महिलांसह दोन लहान मुले व एक पुरुष होते. सदर कारमधील सदस्य हे दुपारी आपल्या नातेवाईकांकडे जात असताना ही दुदैवी घटना घडली.
Breaking News: Kidnapping of a minor girl