कार ड्रायव्हरने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार
नांदेड | Rape Case : नांदेडमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual abuse) केल्याप्रकरणी एका आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष भंडारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
संतोष हा पेशाने कार ड्रायव्हर आहे. संतोषने पीडित मुलीचे आधी अपहरण केले. त्यानंतर तिला गुजरातमधील अहमदाबाद शहरात घेऊन जात तिथे तिच्यावर शारिरीक संबंध (sexually abuse a minor girl) अत्याचार केले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली
नांदेडमधील कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथे व्यवसायाने कार ड्रायव्हर असलेल्या संतोष भंडारे याने नांदेड शहरातील एका मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये नेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फोन रेकॉर्डिंग, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि फोन ट्रेसिंग करीत या अपहरणाचा शोध लावला.
Web Title: Kidnapping and sexually abuse a minor girl