अल्पवयीन दिव्यांग मुलीचं अपहरण करून दारू पाजून तिच्यासोबत अश्लील कृत्य
पुणे | Pune Crime: घराजवळ खेळत असलेल्या एका १० वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचं दोघांनी अपहरण (kidnap) केलं. त्यानंतर तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य (porn action) केल्याची धक्कादायक घटना काळेपडळ परिसरात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका 32 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी राठोड नावाचा व्यक्ती आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण, विनयभंग (Molestation) आणि बाललैंगिक अत्याचाराच्या (Sexual harassment) विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 10 वर्षाची मुलगी दिव्यांग असून तिला बोलताही येत नाही. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ती घराजवळ असलेल्या कॉलनीत खेळत होती. यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी तिला कशाचे तरी आमिष दाखवून मोटारसायकलवरुन जबरदस्तीने एका ठिकाणी पळवून नेले. तिथे मुलीच्या दिव्यांगपणाचा फायदा घेऊन राठोड आणि त्याच्या साथीदाराने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करत विनयभंग केला.
मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. तब्बल दोन ते अडीच तासांनंतर रात्री साडेअकरा वाजता ती घराजवळच सापडली. आरोपी राठोड याने तिला ती रहात असलेल्या परिसरात आणून सोडून दिलं. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी त्याला पाहिलं आणि याबाबतची माहिती त्या मुलीच्या पालकांना दिली. मुलीने आईला सांकेतीक भाषेत तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत राठोड आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली.
Web Title: Kidnapping a minor paralyzed girl, drinking alcohol and having sex with her