Home अहमदनगर अहमदनगर: मामाच्या अल्पवयीन मुलीला पळविले

अहमदनगर: मामाच्या अल्पवयीन मुलीला पळविले

Breaking News | Ahmednagar: एका अल्पवयीन मुलीला (वय १५) पळवून नेल्याची घटना मामीची पोलिसांत धाव; भाचावर गुन्हा.

kidnapped-uncles-minor-daughter

अहमदनगर:  नगर शहरातील वाकोडी – रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला (वय १५) पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी एकच्या दरम्यान घडली. मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने तिच्या आईने कोतवाली पोलिसात मंगळवारी (दि. ६) धाव घेत फिर्याद दिली.

दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील भाचावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे पती सोमवारी सकाळी कामावर गेले होते. त्यावेळी त्यांची मुलगी घरीच होती. मुलीचे सराव पेपर सुरू असल्याने ती पेपरसाठी शाळेत

जाणार होती. दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी यांना शाळेतील शिक्षकाने फोन करून मुलगी पेपरसाठी आली नसल्याची माहिती दिली. फिर्यादी यांनी पतीला मुलगी शाळेत गेली नसल्याचे कळविले. ते दोघे कामावरून घरी आले व त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मग त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांच्या भाचाचा मोबाईल बंद लागला. सुमारे दीड महिन्यापूर्वी भाचाने मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने भाचानेच मुलीला पळवून नेले असल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आली. कोतवाली पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.

Web Title: kidnapped-uncles-minor-daughter

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here