Home अहमदनगर नगरमधून पळवून नेलेली मुलगी सापडली गुजरातमध्ये

नगरमधून पळवून नेलेली मुलगी सापडली गुजरातमध्ये

Breaking News | Ahmednagar: मुलगी पळवून नेणाऱ्या आरोपीला गुजरातमधून ताब्यात.

Kidnapped girl found in Gujarat

अहमदनगर: नगर तालुक्यातील एका गावातून पळवून नेलेल्या सतरा वर्षाच्या मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी गुजरातमधील बावला (जि. अहमदाबाद) येथून ताब्यात घेतले.

सागर रमेश मुदळकर (वय 25, रा. बाबुर्डी घुमट, ता.नगर) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी मुदळकर याने 5 जानेवारी रोजी या मुलीला घरातून पळवून नेले होते. तिचा दिवसभर शोध घेवूनही ती न आल्याने तिच्या वडिलांनी रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी प्रारंभी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तांत्रिक तपासात या मुलीसह आरोपी गुजरातमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण, राजू खेडकर, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन या दोघांना शोधून काढत ताब्यात घेऊन नगरला आणले. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून आरोपी सागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kidnapped girl found in Gujarat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here