अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खोलीत डांबले, दोन दिवस बलात्कारही केला
Breaking News | Nagpur Crime: एका मित्राच्या घरात डांबून ठेवून सलग दोन दिवस बलात्कार.
नागपूर: मोमीनपुऱ्यात एका युवकाचा खून करणाऱ्या आरोपीने कारागृहातून सुटून आल्यानंतर 14 वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. तिला एका मित्राच्या घरात डांबून ठेवून सलग दोन दिवस बलात्कार (Raped) केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
राहुल श्रीकृष्ण गायकवाड (वय 21, रा. गरीब नवाजनगर, यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुल हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याने अल्पवयीन असतानाच खून केला होता. त्यानंतर तो अनेक गुन्ह्यात सहभागी होता..
सध्या तो भाजीपाल्याचा व्यवसाय करत होता. तर पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती जरीपटका परिसरात राहते. आरोपीची अल्पवयीन मुलीशी मागील 15 दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर या आरोपीने संबंधित मुलीला मित्राच्या घरी नेऊन बलात्कार (Rape) केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Kidnapped a minor girl and kept her in a room, raped her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study