अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून दोन मुलींना पळवले
Ahmednagar News: राहुरी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लग्नाचे आमिष दाखवून दोन मुलींना पळवून (kidnap) नेल्याचा प्रकार घडला.
राहुरी : राहुरी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लग्नाचे आमिष दाखवून दोन मुलींना पळवून नेल्याचा प्रकार घडला. या दोन्ही मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाय आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आला आहे. दि. ३ मे रोजी तिच्या राहत्या घरातून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फारूक हारूण शेख या तरुणाने फूस लावून पळवून नेले. हा गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जन, प्रदीप ढाकणे, रवींद्र कांबळे, अशोक शिंदे यांच्या पथकाने शोध घेतला असता, अकोले बसस्थानक परिसरात हे जोडपे सापडले. आरोपी फारुक हारून शेख (वय २२) याच्यासह त्याला मदत करणाऱ्या तीन साथीदारांविरुद्ध अपहरण तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सादीक सलीम शेख (वय २२) या तरुणाने दि. ४ मे रोजी तरुणीला जमलेले लग्न मोडण्याची धमकी देत पळवून नेले. पोलिसांनी शोध घेतला असता, नगर तालुक्यातील खातगाव टाकळी येथे एका हॉस्पिटलमध्ये या तरुणीला लपवून ठेवत हा तरुण फरार झाला होता. मात्र, मोबाइल लोकेशनवरून काही तासातच पोलिस तेथे पोहोचले अन् त्या तरुणीसह आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी सादिक शेख याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
Web Title: kidnap lured two girls into marriage
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App