अकोले: खिरविरे येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न…
अकोले: खिरविरे येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न…
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार दयावा तशी मूर्ती घडते याच अनुशंगाने समशेरपुर जिल्हा परिषद गटाचा बाल आनंद मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिरविरे( ता. अकोले) येथे आनंदमय वातावरणात संपन्न झाला. अतिशय सुंदर व नयनरम्य अशा स्वागत दिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या स्वागत दिंडीतील वारकरी ,वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, लेझीम पथक,विद्यार्थ्यांनी केलेल्या पारंपरिक तसेच विविध महापुरुषांच्या वेशभूषेने सर्वच ग्रामस्थ तसेच उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
स्वागत दिंडीत विद्यार्थ्यांसमवेत स्वतः समशेरपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे, अकोले पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ,पंचायत समिती सदस्य देवराम सामेरे,खिरविरे गावच्या सरपंच गीताबाई रावते, ग्राम पंचायत सदस्य पंढरीनाथ बेणके यांसह सर्वच ग्रामपंचायत सदस्य, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दिनेश शहा, गावातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामस्थ,मोठया संख्येने उपस्थित होते.यानंतर जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. उदघाटन कार्यक्रमासाठी अकोले तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत हेही उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना पंचायत समिती उपसभापती मारुती मेंगाळ म्हणाले की मराठी शाळा व शिक्षकांचे कार्य हे संस्कृती रक्षक व गुणवत्तादायी आहे.पुन्हा एकदा मराठी शाळेच्या पटसंख्येत वाढ होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.जिल्हा परिषद सदस्या सुषमा ताई दराडे यांनी बालआनंद मेळाव्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयोगी आहे असे उदगार काढले.चित्रकला,चित्रशिल्प,रां गोळी दालनात विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध रंगांची सुंदर चित्रे,रांगोळी पाहून पाहुणे हरखून गेली.खाद्यान्न दालनात तर अक्षरशः अगदी चविष्ट,चटकदार व सकस पदार्थांची रेलचेल होती.इडली,डोसा,पाणीपुरी, दहीवडे, कांदेपोहे,ढोकळा,साबुदाणा वडे,अप्पे,गुलाबजामुन,थालीपीठ,इ विविध पदार्थांचा उपस्थित पाहुणे,ग्रामस्थ, शिक्षक,विद्यार्थी यांनी मनमुराद आस्वाद घेतला.
दुपार सत्रात विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा,तीन पायांची शर्यत, चमचा लिंबू,गाढवाला शेपटी लावणे,बादलीत चेंडू टाकणे अशा विविध मनोरंजक खेळांचा आस्वाद घेतला.दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही भाजीबाजाराने झाली.भाजीबाजारातील हिरव्यागार व ताज्या रानभाज्या घेण्यासाठी विद्यार्थी,ग्रामस्थांसोबतच शिक्षकांची पण लगबग सुरू होती.भाजीबाजार सुरू असतानाच चालता बोलता हा मनोरंजक खेळ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.दुपारी विद्यार्थ्यांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला.
दुपार सत्रात विद्यार्थ्यांनी विविधांगी व नयनरम्य असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व शेवटी पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. हा दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न करण्यासाठी समशेरपूर गटातील सर्वच जिल्हा परिषद शाळा व त्यांचे शिक्षक ,मुख्याध्यापक, खिरविरे, केळी, पाडोशी,मान्हेरे, पिंपरकणे, समशेरपूर या सहाही केंद्रांचे केंद्रप्रमुख ,खिरविरे बिटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णा फटांगरे ,समशेरपूर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ व ग्रामपंचायत खिरविरे या सर्वांचेच अनमोल सहकार्य लाभले.
पहा बातमीत:संगमनेर: महामार्गावर कुत्रे आडवे गेल्याने कारने घेतली पलटी भीषण अपघात
Website Title: Khirvire Bal Anand rally is full of enthusiasm
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.
प्रमोटेड बातम्या: