Home संगमनेर आ.खताळ यांच्या फ्लेक्स फाडून विटंबना, महायुती कार्यकर्त्यांकडून संताप

आ.खताळ यांच्या फ्लेक्स फाडून विटंबना, महायुती कार्यकर्त्यांकडून संताप

Breaking News | Sangamner:  येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देणारे आमदार अमोल खताळ यांचे फ्लेक्स अज्ञात इसमांनी फाडून त्याची विटंबना.

Khatal's flex was torn and mocked, anger from Mahayuti workers

खांडगाव – तालुक्यातील खांडगाव येथे श्रावण मासारंभानिमित्त महादेव मंदिरात येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देणारे आमदार अमोल खताळ यांचे फ्लेक्स अज्ञात इसमांनी फाडून त्याची विटंबना केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

याबाबत शहर पोलिसांना निवेदन देत ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच फ्लेक्सवरील फोटोला दुग्धाभिषेक करून आपल्या तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. हा प्रकार आज शनिवारी सकाळी घडला. या घटनेनंतर आ. अमोल खताळ यांनी सोशल माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करत तुम्ही माझा फोटो फाडू शकता पण जनतेच्या मनात मी जे स्थान मिळविले आहे ती प्रतिमा तुम्ही कधी फाडू शकत नाही असे म्हंटले आहे.

Breaking News: Khatal’s flex was torn and mocked, anger from Mahayuti workers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here