आमदार खताळांवर हल्ला करणाऱ्या खांडगावच्या तरुणावर गुन्हा , पोलीस कोठडी
Breaking News | Sangamner Crime: आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संगमनेर : आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करणारा तरुण प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (रा. खांडगाव) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मालपाणी लॉन्स येथे (दि.२८) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास राजस्थान युवक मंडळ यांनी आयोजित केलेला संगमनेर फेस्टिव्हल कार्यक्रमाकरीता आमदार खताळ हे हजर होते. तसेच मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी प्रसाद गुंजाळ याने जमावाचा फायदा घेऊन हस्तांदोलन करण्याचा बहाणा करुन अचानक आमदारांवर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रसाद गुंजाळ यास अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा यामध्ये सहभाग आहे का? याबाबत तपास सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे करीत आहेत. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Breaking News: Khandgaon youth booked for attacking MLA Khatal, remanded in police custody