अहिल्यानगर: आंब्याच्या झाडाजवळ ५०० रुपये ठेवून घेतला गळफास
Ahilyanagar Suicide: शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना.
शिर्डी: शहरातील नगर-मनमाड रस्त्याजवळ असलेल्या फुल मार्केट जवळील एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ असून त्याने पांढरा हाफ शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. त्याच्च्या हातावर ‘सुवर्णा’ असे गोंदलेले होते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ज्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करण्यात आली, त्या झाडाखाली पाचशे ते साडेपाचशे रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. या रकमेचा आणि आत्महत्येचा काही संबंध आहे का, याचीही चर्चा सुरू आहे. विशेषतः हा रस्ता रहदारीने भरलेला असल्याने आत्महत्या मध्यरात्रीच्या सुमारास झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात
आला आहे. घटनास्थळी मृतदेहाच्या ओळख पटवण्यासाठी आवश्यक असा कोणताही पुरावा आढळला नाही. दोन वर्षांपूर्वी याच परिसरात चिकूच्या बागेत एका ३५ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती. त्या खुनाचा तपास अद्याप अपूर्ण असतानाच या नवीन घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पैसे ठेवून जीवनाचा शेवट या इसमाने आत्महत्येपूर्वी आंब्याच्या झाडाजवळ पाचशे ते साडेपाचशे रुपये ठेवले, पैशांचा मोह सोडत गळफास घेऊन जीवन संपवल्याची ही शिर्डीतील पहिलीच घटना आहे. यामुळेपरिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास केला. मृतदेह ओळख पटवण्यासाठी दवाखान्यात ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले की, या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
Web Title: kept 500 rupees near the mango tree and hanged himself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News