क्षितिज फाउंडेशन नवलेवाडी यांचेवतीने केळंगुण येथील कै. नानासाहेब देशमुख वृद्धाश्रमात फराळ
अकोले प्रतिनिधी: क्षितिज फाउंडेशन अमृतनगर, नवलेवाडी यांचेवतीने केळंगुण येथील कै. नानासाहेब देशमुख वृद्धाश्रमात वृद्धांसाठी फराळ व किराणा मालाचे वाटप करून त्यांची दिवाळी साजरी केली.
क्षितिज फौंडेशन ही संस्था नुकतीच स्थापन झाली असून सामाजिक जाणिवेतून हा पहिलाच उपक्रम स्तुत्य असल्याची भावना वृद्धाश्रमचे व्यवस्थापक श्री वाकचौरे यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वैरागर यांनी केले. आज फराळाबरोबर 3500 रुपयांचा किराणा म्हणून १० कि. साखर, २ कि शेंगदाणे,५ कि. बेसन, २० कि. गहू आटा, १० कि. गोडेतेल व फराळामध्ये बेसन लाडू, रवा लाडू, मो्तीचुर लाडू, करंजी शेवचिवडा इ. या प्रसंगी वाटप करण्यात आले. यावेळी व्यवस्थापक श्री. वाकचौरे यांनी किराणा माल स्वीकारून आभार व्यक्त केले.
यावेळी प्रेरणा आर्बन मल्टीपल निधी चे संस्थापक अध्यक्ष प्रदिप जाधव, सागर पवार ,क्षितिज फाउंडेशन च्या सचिव सौ. वैशाली वैरागर संतोष जंगम, वृद्धाश्रमाचे कर्मचारी वर्ग व एकूण ४४ वृद्ध महिला व पुरुष सामाजिक अंतर व मास्क चा वापर करून उपस्थित होते. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.
Web Title: Kelungun Nanasaheb Deshmukh in old age home