खांबावर वीजवाहक तारेचा शॉक बसून वायरमनचा मृत्यू
कर्जत | karjat: कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबरला खांबावर वीज दुरुस्तीचे काम सुरु असताना वीजवाहक तारेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
कुंडलिक ज्ञानदेव कानगुडे वय ३७ असे मयत झालेल्या वायरमनचे नाव आहे. कुंडलिक हा राशीन येथील महावितरण कंपनीमध्ये एका ठेकेदारामार्फत कंत्राट बेसेस वर वायरमन म्हणून कार्यरत होता.
कानगुडे हे शुक्रवारी सकाळी वीज दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढले. काम सुरु असताना खांबावरील वीज तारांमधून विजेचा शॉक बसला. ते खांबावरून खाली कोसळताच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे परिवारात आई, वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Karjat Wireman Dies aftershock