पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून करून पतीची आत्महत्या
कर्जत: पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्यानंतर पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे घडली. या घटनेमागील कारण समजू शकले नाही.
योगिता राहुल गजरमल, राहुल दिलीप गजरमाळ वय ३० रा. कुळधरण ता. कर्जत असे या मयतांची नावे आहे.
कुळधरण येथे राहुलगजरमल हे दाम्पत्य राहत होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास योगिता हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला जीवे ठार मारले. आणि नंतर घराजवळच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन पती राहुलने आपले जीवन संपविले. हा सर्व प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Karjat Wife Murder and husband Suicide