कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षपदी व उपनगराध्यक्षपदी यांची निवड
कर्जत | Karjat Nagar Panchayat Mayor and Deputy Mayor: कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये उषा अक्षय राऊत नगराध्यक्षपदी ( Usha Akshay Raut) तर रोहिणी सचिन घुले (Rohini Sachin Ghule) उपनगराध्यक्षपदी यांची निवड झाली आहे.
कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उषा अक्षय राऊत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. तर उपनगराध्यक्ष पदासाठी रोहिणी सचिन घुले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे या दोघींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
वाचा: Ahmednagar News
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर कर्जतमध्ये सर्व नगरसेवकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रोहित पवार यांचाही समावेश होता.
Web Title: Karjat Nagar Panchayat Mayor and Deputy Mayor