हृदयदायक घटना: मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू
कर्जत | : कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी येथे मायलेकांचा विहिरीत बुडून (drowned in a well) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत राजेश अभिमन्यू गलांडे यांनी या घटनेची कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डोंबाळवाडी नजीकच्या मासाळ वस्ती येथील विश्वनाथ काशिनाथ मासाळ हे मेंढ्या चारीत असताना त्यांनी ओरडून मुलगा विहिरीत पडल्याचे सांगितले. त्यावेळी विष्णू बाजीराव गलांडे व राजेश अभिमन्यू गलांडे यांनी विहिरीकडे धाव घेतली असता त्यावेळी त्यांना माउली मंगेश गलांडे हा विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आला. विहिरीत उडी मारून त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. आणि उपचार करण्यासाठी बारामती येथे हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
घरी आल्यानंतर त्यांना त्याची आई वैशाली मंगेश गलांडे वय २६ व दुसरा मुलगा ओंकार मंगेश गलांडे वय ३ हे घरी आढळून आले नाही. त्यावेळी त्यांना हे विहिरीत पडले असावेत असा संशय आला. त्यामुळे त्यांनी विहिरीतील पाणी मोटारीचे सहायाने काढून पाण्याची पातळी कमी केली. पाण्यात बुड्या घेऊन पाहिले असता त्यांना ते दोघे आढळून आले, दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात शोककळा परिसरात पसरली आहे. अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहे.
Web Title: karjat Mi leka drowned in a well