नाव बदलून राहत होता आरोपी, १० वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद
karjat Crime | कर्जत: १० वर्षापूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेला कर्जत पोलिसांनी जेरबंद केला आहे. सदर आरोपी हा नाव बदलून तालुक्यातच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मोठ्या शिथापीने अटक केली आहे. गोट्या उर्फ लक्षमणतारा पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटेवाडी गावाचे शिवारात ११ जानेवारी २०१० रोजी योगेश हरी कुलकर्णी रा. नाशिक यास सागर पवार व त्याचा बाप, आई तिघही पाटेवाडी व त्याचे इतर साथीदार यांनी फिर्यादीस विश्वासाने घेत १३ हजार रुपये तोळा भावाने एक किलो सोने देतो असा विश्वास देऊन पाटे वाडी येथे बोलावून घेत फिर्यादी व त्याच्या मित्रास चाकूचा धाक दाखवून काठीने मारहाण करून त्याच्या जवळील अडीच लाख रुपये एक मोबाईल व अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी जबरीने चोरून नेली होती. त्यावरून तिघांना अटक करण्यात आली होती. यातील मुख्य आरोपी वांग्या पवार यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर इतर आरोपी फरार झाले होते.
वाचा: Ahmednagar News
या गुन्ह्यातील आरोपी गोट्या पवार हा त्याचे नाव बदलून राहत असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथक रवाना करीत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली असून अटक करण्यात आली आहे.
Web Title: karjat Crime accused who had been absconding for 10 years was arrested