कल्याण अहमदनगर महामार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प
Kalyan Ahmednagar highway: माळशेज घाटाकडे जाणारी वाहतूक ठप्प.
ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाउस सुरु आहे. नदी नाले तुडुंब भरले आहे. ठाणे आणि अहमदनगर हे दोन जिल्हे जोडणारा कल्याण अहमदनगर महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. या महामार्गावरील किशोर गावाजवळ मुरबाडी नदीचे पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.
गेल्या २४ तासात ठाणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणार आणि ठाणे – अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणारा कल्याण अहमदनगर महामार्ग (Kalyan Ahmednagar highway) बुधवारी दुपारच्या सुमारास ठप्प झाला. कल्याण- अहमदनगर महामार्गावर मुरबाड तालुक्यात किशोर गावाजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती.
Web Title: Kalyan Ahmednagar highway under water, traffic jam