संगमनेर: पत्रकारांच्या कारला अपघात, वार्तांकन करण्यासाठी जाताना अपघात
Breaking News | Sangamner: एका वृत्तवाहिनीचे पुणे जिल्ह्यातून आलेले पत्रकार, कॅमेरामन हे प्रवास करत असलेल्या कारचा किरकोळ अपघात.
संगमनेर: शनिवारी अकोले येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शेतकरी मेळाव्या निमित्त कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी चाललेल्या पत्रकारांच्या कारला अपघात झाला असून यामध्ये ते बालंबाल बचावले आहेत. सुदैवाने यात कोणालाही हानी पोहोचली नाही.
शरद पवार हे अकोले येथे पक्षाच्या मेळाव्यासाठी जात होते. तेथील सभेचे वार्तांकन करण्यासाठी एका वृत्तवाहिनीचे पुणे जिल्ह्यातून आलेले पत्रकार, कॅमेरामन हे प्रवास करत असलेल्या कारचा किरकोळ अपघात घडला. समोरील कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पत्रकार, कॅमेरामन हे प्रवास करत असलेली कार पाठीमागून त्या कारला धडकली. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. ही घटना कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील संगमनेर तालुक्यातील चिखली शिवारात घडली.
कारचालकाला सोबत घेऊन एका वृत्तवाहिनीचे पुणे येथील पत्रकार, कॅमेरामन हे प्रवास करत होते. त्यांच्या समोरील एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पत्रकार, कॅमेरामन यांची कार त्या कारला पाठीमागून धडकली. कॅमेरामनला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
Web Title: Journalist’s car accident, accident while going to report
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study