संगमनेर: जोर्वे ग्रामस्थ पोलीस ठाण्याला वेढा घालणार…
Breaking News | Sangamner: जोर्वेनाका परिसरात जमावाकडून शालेय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेर शहरास भेट देऊन पाहणी.
संगमनेर: जोर्वेनाका परिसरात जमावाकडून शालेय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शुक्रवार दि. २२ मार्च रोजी रात्री संगमनेर शहरास भेट देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह संवेदनशील भागात पथ संचलन केले.
संगमनेर शहरातील जोर्वेनाका परिसरातील हाणामारीच्या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्यावतीने २७ मार्च रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरातील दिल्ली नाका, जोर्वेनाका या परिसरात पायी फिरून पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे हे अधिकारी होते. पोलीस अधिक्षकांनी या परिसरात दौरा केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
संगमनेर शहरातील जोर्वेनाका परिसरात जोर्वे गावातील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण आहे. या घटनेतील आरोपींना अद्याप अटक करण्यात न आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. त्यामुळे २७ मार्च रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याला वेढा घालण्याचा निर्णय जोर्वे ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
Web Title: Jorve villagers will besiege the police station
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study