लग्नाच्या वाढदिवशीच जयंत पाटील यांच्याकडे धडकली ‘ईडी’ची नोटीस
Jayant Patil received an ED notice: आयएल अॅण्ड एफएस कंपनीतील कथित घोटाळ्याचे प्रकरण.
सांगली: इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने बुधवारी संध्याकाळी नोटीस जारी केली असून, त्यांना १२ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
दादरच्या कोहिनूर मिल जागेवर उभ्या राहिलेल्या कोहिनूर स्क्वेअर या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कोहिनूर कन्स्ट्रक्शनला आयएल ॲण्ड एफएस कंपनीने कर्ज दिले होते, जे कालांतराने बुडाले. याप्रकरणी जयंत पाटील यांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे. याचप्रकरणी बुधवारी ईडीने आयएल अॅण्ड एफएस आणि त्या कंपनीचे लेखापरीक्षक असलेल्या बीएसआर अॅण्ड असोसिएटस् व डेलॉइट या कंपन्यांवर छापेमारी केली होती.
काय आहे प्रकरण?
२००५ साली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी, बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर आणि राज ठाकरे यांनी कोहिनूर मिल क्रमांक ३ खरेदी केली होती आणि कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली होती. तीनच वर्षात राज या प्रकल्पातून बाहेर पडले. कंपनीला आयएल अॅण्ड एफएस कंपनीने ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, या कर्जाकरिता अपुरे तारण दिल्याचा ठपका ईडीने ठेवला. कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनीने कर्ज थकविल्याने आयएल अॅण्ड एफएस कंपनीला १३५ कोटींचा तोटा झाला.
बुधवारी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याचदिवशी संध्याकाळी ईडीची नोटीस आली. – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष
Web Title: Jayant Patil received an ED notice on his wedding anniversary
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App