बारावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीने घेतला गळफास
जामखेड | Jamkhed: करोना संकट काळात गेल्या काही दिवसांपासून अनेक जणांनी टोकाचे पाउल उचलत आपले जीवन संपविण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहे. असेच काहीसा प्रकार जामखेड तालुक्यात घडला आहे.
जामखेड शहरातील संताजीनगर परिसरातील इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कु. साक्षी बाबासाहेब भालसिंग वय १८ या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साक्षी नगरमधील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. सध्या वसतिगृह बंद असल्याने ती घरीच अभ्यास करत होती.
सकाळच्या सुमारास राहत्या घरात फॅनला साडीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या करण्यात आली. तिला ताबोडतोब दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. साक्षीने आत्महत्या का केली असावी याबाबत उलट सुलट चर्चा परिसरात सुरु आहे.
Web Title: Jamkhed Twelfth grader took the gallows