टेम्पो व दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत एका महिलेचा मृत्यू
जामखेड | Jamkhed: जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात गुरुवारी दुपारी टेम्पो व दुचाकी यांच्या समोरासमोरील धडकेत एक महिला जागीच ठार झाली आहे. टेम्पोसह चालक फरारझाला आहे.
या अपघातात कविरा तांदळे वय ४६ रा. राळेभात वस्ती, जामखे यांचे जागीच निधन झाले आहे. कविरा पप्पू तांदळे व मुलगा प्रमोद तांदळे हे दोघे चांदवड येथून दुचाकीवरून दुपारच्या सुमारास जामखेडला येत होते. आनंदवाडी शिवारात तांदळे यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एका टेम्पोने जोराची धडक दिली. या धडकेत कविरा तांदळे या जागीच ठार झाल्या. या अपघातातील टेम्पोचालक हा टेम्पोसह पसार झाला आहे. याबाबत मयत महिलेचा भाऊ सोमनाथ गायकवाड यांनी जामखेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Jamkhed taluka tempo Bike Accident ladies death