Ahmednagar Suicide: झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या
Jamkhed Suicide | जामखेड: जामखेड तालुक्यातील खर्डा बलखंडी परिसरात एका व्यक्तीने झाडाला गळफास घेतल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले आहे.
जालिंदर रामभाऊ सुरवसे वय ४७ रा. खर्डा ता. जामखेड असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी अचानक जालिंदर सुरवसे हे कोणाला काहीच ना सांगता घरातून बाहेर पडले. ते घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला.
गुरुवारी सकाळी खर्डा, बलखंडी, परिसरातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप धामणे हे करीत आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरवसे यांचे भाऊ होते.
Web Title: Jamkhed One commits suicide by hanging himself from a tree