आयटी इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ
Breaking News | Pune Crime: लॉजमध्ये मृतदेह सापडला, प्रेम प्रकरणातून हत्या (Murder) झाल्याचे उघड झाले.
पुणे: हिंजवडीत आयटी हबमध्ये एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेम संबंधांतून ही हत्या केल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
गेल्या दोन दिवसापासून तिच्या मित्रासोबत एका लॉजमध्ये वास्तव्यास होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या महिलेवर बंदुकीतून गोळीबार करून तिची हत्या करणारा तरुण हा पसार झाला असून हिंजवडी पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.
साँफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलीची ओयो हॉटेलमध्ये गोळ्या घालून हत्या केली आहे. लखनऊ वरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली. त्यानंतर तो मुंबईला पळून गेला. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टलसह अटक केली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
अधिक माहिती अशी की,, दोघे लखनऊचे असून आयटी कंपनीत काम करायचे. दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये राहत होते, लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने महिलेची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर तो मुंबईला पळून गेला. मात्र पळून जाताना मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: IT engineer shot dead Excitement after body found in lodge
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study