पाटबंधारेचा कारभार चव्हाट्यावर, निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
श्रीरामपूर | Shrirampur: पाठबंधारे विभागाच्या कार्यालयातच कालवा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. यामूळ पाठबंधारेतील कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शेतजमिनीत अनुदानित विहीर खोदण्यासाठी दाखला देण्यासाठी साडे तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पैसे घेताना रंगेहाथ पकडले.
विनोद मोगल सोनवणे असे या कालवा निरीक्षकाचे नाव आहे. वय ३० त्याचे मूळ रहिवासी शेंडी भंडारदरा येथील आहे. तो पाटबंधारेच्या वडाळा विभागात काम करत होता.
खानापूर येथील एका शेतकऱ्याला त्याच्या पत्नीच्या नावाने अनुदानित विहीर खोदायची असल्याने त्याकरिता विहीर पाटपाण्याच्या लाभ क्षेताखाली येत नसल्याचा दाखला हवा होता. निरीक्षक सोनवणे यांनी त्यासाठी चार हजार रुपये मागितले. मात्र तडजोड अरुण साडे तीन हजार रुपये ठरविण्यात आले. मंगळवारी सोनावणे यांनी हे पैसे कार्यालयातच स्वीकारले. त्यावेळी लाचलुचपत विभागाने त्याला ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Web Title: Irrigation is on the rise, inspectors are caught in a bribery trap